KAMLESH. मुंबई. मुंबईतील चर्चगेट येथील वानखेडे स्टेडियम,गरवारे क्लब,दुसरा माळा या ठिकाणी मुंबईतील रूणानुबंध सामाजिक संस्थे द्वारा महाराष्टातील फक्त धनगर समाजातील कवि कवयित्री साठी स्पंदन मल्हारी......उधळण धनगरी शब्दांची या महाकविसंमेलनातून धनगरी बोलीभाषा तथा संस्कती जतन करण्यास हातभार लावणारी काव्य रचना,पोवाडे,ओवी,चारोळ्या,गाणी सादर करण्यात आली.संस्थेच्या 4थ्या पर्वातील हा एक उपक्रम धनगर समाज बांधवांसाठी अविस्मरणीय ठरला.या प्रसंगी मुंबईतील कवि भारत कवितके यांनी जाग धनगरा....ही कविता वाचली.टाळ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.इतिहास संशोधक संजय सोनवणी यांच्या धनगरांचा इतिहास...या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.धनगर समाजातील राजकीय,सामाजिक,शासकीय,प्रतिष्ठीत क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या.
महाकविसंमेलनातील कवि कवयित्रीना मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.याप्रसंगी संजय सोनवणी,राजू काका जांगळे,जयसिंग शेडगे,भारत कवितके आदि मान्यवर उपस्थित होते.तर संस्थेच्या विकास लांबोरे,मंगेश येडगे,दिपक झोरे,राम सर,पांडुरंग कोकरे आदि पदाधिकार्यानी कार्यक्रम यशस्वी करण्या साठी विशेष परिश्रम घेतले.महाराष्टातील विदर्भ,मराठवाडा,पुणे,कोकण विभागातून मोठ्या प्रमाणात समाज बांधव व भगिनी कार्यक्रमाला उपस्थित होत्या.

No comments:
Post a Comment