कमलेश.#मुंबई। विभागीय काँग्रेस समितीच्या वतीने सन्माननीय अध्यक्ष श्री एकनाथरावजी गायकवाड साहेबांच्या अध्यक्षतेखाली लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी महोत्सव समितीची स्थापना करण्यात आली!आज मुंबई काँग्रेस कार्यालयात समितीचे अध्यक्ष श्री एकनाथ गायकवाड साहेबांच्या अध्यक्षतेखाली समितीची कार्यकारणी व कार्यकर्यांची बैठक संपन्न झाली, यावेळी मुंबई काँग्रेसचे प्रवक्ता, माजी आमदार श्री चरणसिंग सपराजी, महासचिव श्री संदेश कोंडविलकरजी, पत्रकार आणि गोरेगाव विधानसभेचे उमेदवार श्री युवराज मोहितेजी ,महिला काँग्रेस अध्यक्षा श्रीमती अजंता यादवजी, अनुसूचित जाती विभागाचे मुंबई अध्यक्ष श्री कचरू यादवजी,मुंबई काँग्रेसचे सचिव श्री किशोर मुंडकल, सचिव विकास तांबे, शिवकुमार लाडजी, महेंद्र मुणगेकरजी, अनुसूचित जाती विभागाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री डी व्ही साठे साहेब, समितीचे नवनिर्वाचित निमंत्रक श्री गुलाब साठे,समिती सदस्य देवेंद्र खलसे, हरिष सातपुतेजी, व इतर मान्यवर,मातंग समाजाचे नेते, कार्यकर्ते आणि समाजबांधव,भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.
या समितीच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष म्हणून आणि सरकार म्हणून कशाप्रकारे कार्यक्रम घेतले जातील यासंदर्भात विचारविनिमय करण्यात आले.तसेच मराठी भाषा दिनाच्या दिवशी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मुंबई काँग्रेस च्या वतीने साहित्यरत्न हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे त्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.*


No comments:
Post a Comment